मिरवणूक निघणार; विसर्जन होणार नाही; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; 'फायबर'ची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

यंदा गिरगाव येथील पहिली सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा अनोखा उपक्रम राबविला आहे. मंडळाने प्रथमच ३८ फुट उंचीची "फायबर"ची मूर्ती बसविली आहे. या मूर्तीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येईल, मात्र या मूर्तीचे विसर्जन न करता प्राणप्रतिष्ठा केलेल्या लहान मूर्तीचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय मंडळाने घेतला आहे.
मिरवणूक निघणार; विसर्जन होणार नाही; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; 'फायबर'ची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
Published on

मुंबई : यंदा गिरगाव येथील पहिली सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा अनोखा उपक्रम राबविला आहे. मंडळाने प्रथमच ३८ फुट उंचीची "फायबर"ची मूर्ती बसविली आहे. या मूर्तीची भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येईल, मात्र या मूर्तीचे विसर्जन न करता प्राणप्रतिष्ठा केलेल्या लहान मूर्तीचे विसर्जन करण्याचा अनोखा निर्णय मंडळाने घेतला आहे.

गिरगाव सीपी टॅंक येथील पहिली सुतारगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदापासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा श्रीगणेशा केला आहे. त्यानुसार मंडळाने यंदा ३८ फूट उंचीची फायबरची मूर्ती घेतली आहे. या मूर्तीचे विसर्जन करणे शक्य नसल्याने या मूर्तीची चौपाटीपर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे. येथे प्राणप्रतिष्ठा आणि पूजा करण्यात येणाऱ्या मूर्तीचे विसर्जन होईल. तर फायबरच्या मूर्तीचे विसर्जन न करता ती पुन्हा मंडळामध्ये आणण्यात येणार आहे. ही मूर्ती फोल्डेबल असल्याने ती एका पेटीमध्ये सुरक्षित ठेवून पुढील वर्षी पुन्हा ही मूर्ती नवीन रुपात बसविण्यात येईल, असे मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी सांगितले.

मिरवणूक निघणार; विसर्जन होणार नाही; पर्यावरण संवर्धनाचा संकल्प; 'फायबर'ची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती
नवशक्ति-FPJ इको गणेश: पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फोटो शेअर करा आणि जिंका मोठी बक्षिसे

१९६२ साली हे मंडळ स्थापन झाले. मंडळ दरवर्षी सार्वजनिक उपक्रम राबवत असते. आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात येते. पहिली सुतारगल्लीच्या समोरून मोठे गणपती जातात. मंडळ दहा दिवस गणेशोत्सव साजरा करते. तर नवरात्रात महिलांसाठी हळदीकुंकूचे आयोजन करण्यात येते.

काही वर्षांपूर्वी कोल्हापूर सांगलीमध्ये आलेल्या पुरावेळी मंडळाने ७ लाख रुपयांची मदत केली होती. सांगली जिल्ह्यातील ७ गावे निवडून त्यांना दैनंदिन वापराच्या ३६ वस्तू देण्यात आल्या होत्या. दरवर्षी मंडळ गणेशोत्सवात रक्तदान शिबिर आयोजित करते. याला विभागातील नागरिक आणि गणेशभक्तांचा प्रतिसाद मिळत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन सांगळे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in