गणेशोत्सवात इको फ्रेंडली सजावटीचा ट्रेंड; कापडी पडदे, मखरला ग्राहकांची पसंती

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा या आवाहनाला गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीसाठी नवनवीन साहित्य बाजारात उपलब्ध असले तरी भक्त इको फ्रेंडली सजावटीला प्राधान्य देत आहेत.
गणेशोत्सवात इको फ्रेंडली सजावटीचा ट्रेंड; कापडी पडदे, मखरला ग्राहकांची पसंती
Published on

मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा या आवाहनाला गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सजावटीसाठी नवनवीन साहित्य बाजारात उपलब्ध असले तरी भक्त इको फ्रेंडली सजावटीला प्राधान्य देत आहेत. घरगुती गणेश मूर्तींच्या सजावटीसाठी कापडी पडदे, कापडी मखर खरेदीला भक्त पसंती देत असल्याचे दुकानदारांनी सांगितले.

अलिकडच्या काही वर्षांत इको फ्रेंडली सजावटीचे वेगवेगळे पर्याय बाजारात आणि घराघरात लोकप्रिय झाले आहेत. सजावटीसाठी झेंडू, जुई, मोगरा आणि गुलाबाची माळ, केळीची पाने व नारळाच्या शेंड्यांचा वापर करून मंडप सजवले जात आहे. सौंदर्यासोबतच पर्यावरणाची काळजी घेतली जात आहे.

नारळांनी भाव खाल्ला

बाजारात सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी एकच झुंबड उडाली आहे. लाडक्या गणरायाला प्रसादामध्ये मोदक दिले जातात. विशेष करून बाप्पाची प्रतिष्ठापना होते त्यावेळी उकडीच्या मोदकचा प्रसाद चढवला जातो. उकडीचे मोदक तयार करण्यासाठी नारळाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे एरव्ही २० रुपयांना मिळणाऱ्या नारळाची सध्या सणासुदीच्या काळात ५० ते ६० रुपयांना विक्री केली जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in