ED Action: दादरमधील प्रसिद्ध भरतक्षेत्र साडी दुकानावर ईडीची धाड; 15 लाख रुपयांची रक्कम जप्त

फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले असल्याचे सूत्रांनी माहिती सांगितली आहे.
ED Action
ED ActionANI

मुंबईमधील नावाजलेले एकमेव मार्केट म्हणजे दादर आणि त्याचं दादरमधल्या भरतक्षेत्र या साडीच्या दुकानावर काल ईडीनं धाड घालून कसून चौकशी केली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी या धाडीनंतर भरतक्षेत्र या साडीच्या दुकानात तब्बल 12 ते 13 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 15 लाख रुपये कॅश जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,आर्थिक अफरातफर या प्रकरणात ही धाड टाकली होती.

मुंबईचा दादर येथील प्रसिद्ध साडीचे दुकान भरतक्षेत्र आणि त्याच्या मालक मनसुखलाल गालाच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यात तब्बल 15 लाख रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी ईडीने भरतक्षेत्रचे मालक मनसुख गाला त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट आणि इतरांच्या एकूण पाच ठिकाणांवर छापे टाकले होते. जवळपास 12 तास हे सर्च ऑपरेशन सुरू होते. 2019 साली बांधकाम व्यवसायिक अरविंद शहा यांच्या तक्रारीवर दाखल झालेल्या फसवणूक आणि फॉर्जरीच्या प्रकरणात हे सर्च ऑपरेशन राबविण्यात आले असल्याचे सूत्रांनी माहिती सांगितली आहे.

बांधकाम क्षेत्रातील एका कंपनीत अरविंद शहा आणि मनसुखलाल गाला हे दोघे भागीदार असून गालाने बेकायदेशीररित्या शहांच्या कुटुंबाचे कंपनीतील 50% भाग 25 टक्क्यावर आणल्याचा शहांनी आरोप केला होता. शहा यांना तब्बल 133 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं होते. याप्रकरणी मनी लॉन्ड्रीच्या अनुषंगाने ईडी अधिक तपास करत आहे. भरतक्षेत्र या दुकानाचे मालक मनसुखलाल गाला यांच्यावर 2019 साली आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in