‘पार्ट टाईम जॉब’ घोटाळ्याचा पर्दाफाश ‘ईडी’ची कारवाई; क्रिप्टोकरन्सी, ६ कोटी जप्त

देशाच्या गल्लीगल्लीत ‘पार्ट टाईम जॉब’ च्या जाहिराती दिसतात
‘पार्ट टाईम जॉब’ घोटाळ्याचा पर्दाफाश ‘ईडी’ची कारवाई; क्रिप्टोकरन्सी, ६ कोटी जप्त

मुंबई : देशाच्या गल्लीगल्लीत ‘पार्ट टाईम जॉब’ च्या जाहिराती दिसतात. नोकरी मिळण्याच्या आशेने बेरोजगार त्यांच्याशी संपर्क साधतात. मात्र त्यांच्या पदरात फसवणूक येते. अशा चीनी कंपनीशी संबंधित एका कंपनीवर ‘ईडी’ने या प्रकरणी कारवाई केली आहे. त्यांनी ६.४७ कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यात ७१.३ लाखांच्या क्रिप्टोकरन्सीचा समावेश आहे.

‘पार्ट टाईम जॉब’च्या ऑनलाईन घोटाळ्यात भारतातील विविध राज्यांमधील नागरिकांची फसवणूक झाली आहे. या घोटाळ्यासाठी चीनी हॅकर्स‘ ‘किपशेअरर’ या ॲॅपचा वापर करतात. ते तरुणांना ‘पार्ट टाईम’ नोकरीच्या भूलथापा देऊन त्यांच्याकडून पैसे गोळा करतात. या चिनी हॅकर्सनी भारतात कंपन्या स्थापन केल्या आणि भारतीय नागरिकांना डायरेक्टर, ट्रान्सलेटर, एचआर मॅनेजर आणि टेलिकॉलर म्हणून भरती केले.

‘किपशेअरर ॲॅप’च्या माध्यमातून तरुणांना ‘पार्ट टाईम’ जॉबचे आमीष दाखवले जाते. त्यातून लोकांना गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे गोळा केले जातात. या कंपन्या तरुणांना छोटी छोटी कामे सांगतात. त्यात सेलिब्रिटीच्या व्हीडिओला लाईक करून ते सोशल मीडियावर टाकण्याचा समावेश असते. हे काम पूर्ण केल्यावर प्रति व्हीडिओ २० रुपये त्यांच्या ‘किप शेअरर’ खात्यात टाकले जातात. फसवणुकीचा पैसा हे हॅकर्स बँक खात्यातून वळते करून क्रिप्टोकरन्सीत गुंतवतात. त्यातून ते चीनच्या क्रिप्टो एक्स्चेंजमध्ये पाठवला जातो.

‘ईडी’ने या प्रकरणी टोनिंगवर्ल्ड इंटरनॅशनल प्रा. लि., अन्सोल टेक्नॉलॉजी प्रा. लि., रेड्रॉकून सर्व्हिसेस इंडिया प्रा. लि., इनर्जिको डिजीटल प्रा. लि., ब्रीज तेरा टेक्नॉलॉजीस प्रा. लि, अशेनफॉल्यूस टेक्नॉलॉजीस प्रा. लि. आदी कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी ‘ईडी’च्या तपासावरून दक्षिण सीईएन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in