खोटी कागदपत्रे, सोन्याची बिस्किटं आणि बार, कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

संजय शाहांनी ६० लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले
खोटी कागदपत्रे, सोन्याची बिस्किटं आणि बार, कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून आरोपपत्र दाखल

कोविड काळात मुंबई महापालिकेत झालेल्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ईडीकडून याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यानुसार कथित कोविड घोटाळ्यातील रक्कमेतून सोन्याची बिस्किटं खरेदी करण्यात आली असून ही बिस्किटं लाचेच्या स्वरुपात मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.

ईडी या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचे सुजीत पाटकर आणि त्यांचे सहकारी हेमंत गुप्ता, संजय शाह आणि राजीव साळुंखे यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोप पत्रात मुंबई महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बिसुरे, डॉ. अरविंद सिंग, दहिसर जंम्बो कोविड सेंटरचे डीन यांचा देखील समावेश आहे.

संजय शाहांनी ६० लाख रुपयांची सोन्याची बिस्किटं आणि बार खरेदी केले. हे सुजित पाटकर यांच्यामार्फत महापालिका अधिकाऱ्यांसह अन्य व्यक्तींना लाचेच्या स्वरुपात देण्यात आले. तसंच सुजित पाटकर यांनी १५ लाख रुपये इतर महापालिका कर्मचाऱ्यांना दिली अशी माहिती ईडीने दाखल केलेल्या आरोपपात दिली आहे

२०२० सालच्या जुलै ते डिसेंबर या काळात दहिसर कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉ. किशोर बिसुरे यांना लॅपटॉपसह २ लाख रुपयांची रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू मिळाल्याचंही ईडीने आरोपपात म्हटलं आहे याच बरोबर लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीने खोटी कागदपत्र सादर करुन कंत्राट मिळवलं. यानंतर योग्य मनुष्यबळ न पुरवता कोरोना रुग्णांचा जीव धोक्यात घातला. या कंपनीने गैरमार्गाने २१.०७ कोटी रुपये कमावल्याचं देखील ईडीने आरोपपत्रात म्हटलं आहे. हिंदूस्तान टाईम्नसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in