माजी पोलीस आयुक्तांना ईडीचे समन्स जारी

मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे
माजी पोलीस आयुक्तांना ईडीचे समन्स जारी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे समजले जाणारे संजय पांडे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) रविवारी समन्स जारी करण्यात आले आहे. त्यांना ५ जुलै रोजी ११.३० वाजता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता संजय पांडे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तीन दिवसांपूर्वीच संजय पांडे हे सेवानिवृत्त झाले आहेत.

विशेष म्हणजे संजय पांडे यांना मुंबईतील ईडी कार्यालयात नव्हे तर दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज प्रकरणी संजय पांडे यांना बजावण्यात आलेल्या समन्सने राज्याच्या राजकीय वातावरणात वेगवेगळ्या चर्चांना उधाण येण्याची दाट शक्यता आहे.

आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी एका जुन्या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरू असताना मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांचे नाव समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स जारी केले आहे. ३० जून रोजी ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आले आहे.

संजय पांडे यांनी पोलीस सेवेतून निवृत्त होण्यासाठी राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी २००१ मध्ये स्वत:चे आयटी ऑडिट फर्म सुरू केले होते. या दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नव्हता. त्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत हजर राहावे लागले. त्यावेळी संजय पांडे यांनी आपली आई आणि मुलाला फर्मचे संचालक केले होते. आयसेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in