मुंबई : ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायाने कोलकाता, भोपाळ व मुंबई शहरात मिळून एकूण ३९ ठिकाणी छापे मारून सुमारे ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता गोठवली आहे. ईडीने हे छापे मेसर्स महादेव ऑनलाईन बुक बेटिंग अॅप प्रकरणात मारले आहेत. याच प्रकरणात हवालामार्फत पैसे घेतल्याप्रकरणी हिंदी सिनेसृष्टीतील काही मोठे कलाकार व गायक मिळून १४ जण ईडीच्या रडारवर आहेत. यात टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेहअली खान, विशाल दादलानी यांचा समावेश आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मेसर्स महादेव ऑनलार्इन बुक बेटिंग अॅप कंपनीचे प्रवर्तक सौरभ चंद्राकर यांचे २०२३ साली यूएर्इमध्ये लग्न झाले होते. या विवाह सोहळ्यात तब्बल २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. विवाह सोहळ्यातील मनोरंजन कार्यक्रमासाठी १४ सेलिब्रिटींना बोलावण्यात आले होते. या सेलिब्रिटींनी हवालामार्फत बिदागी घेतल्याचेही उघडकीस आले आहे.
छत्तीसगडमधील निवासी रवी उप्पल आणि सौरभ चंद्रकार हे महादेव बेटिंग अॅप कंपनीचे प्रवर्तक आहेत. ईडीच्या कारवार्इत यांच्याशी संबंधित तब्बल ४१७ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. याच प्रकरणात हवालामार्फत पैसे घेतल्याप्रकरणी हिंदी सिनेसृष्टीतील काही मोठे कलाकार व गायक मिळून १४ जण ईडीच्या रडारवर आहेत. यात टायगर श्रॉफ, नेहा कक्कर, सनी लिओनी, कृष्णा अभिषेक, राहत फतेहअली खान, विशाल दादलानी आदींनी दुबर्इतील या विवाह सोहळ्यात सादरीकरण केले होते.