मुंबई, अहमदाबादमध्ये १२ ठिकाणी ईडीचे छापे; टायल समूहाच्या मनी लाँड्रिंगचा तपास

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी दिवाळखोरी प्रक्रियेचा कथित गैरवापर आणि बँक फसवणूक प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि अहमदाबादमधील १२ ठिकाणांवर शोधमोहीम राबवली.
मुंबई, अहमदाबादमध्ये १२ ठिकाणी ईडीचे छापे; टायल समूहाच्या मनी लाँड्रिंगचा तपास
Published on: 

आशीष सिंह/मुंबई

प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे रक्षण करण्यासाठी दिवाळखोरी प्रक्रियेचा कथित गैरवापर आणि बँक फसवणूक प्रकरणाचा तपास करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि अहमदाबादमधील १२ ठिकाणांवर शोधमोहीम राबवली.

ईडीच्या कोलकाता क्षेत्रीय कार्यालय-२ कडून ३० सप्टेंबरला पीएमएलए अंतर्गत टायल समूहाचे प्रवर्तक प्रवीण टायल आणि सौरभ टायल यांच्यासह अन्य व्यक्तींच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली. या शोधमोहिमेदरम्यान एजन्सीने प्रवीण टायल यांच्या निवासस्थानावरून २० लाख रुपयांची रोकड जप्त केली तसेच प्रवर्तक-संचालकांशी संबंधित अनेक स्थावर मालमत्तेची कागदपत्रे सापडली, जी या आधी तपास यंत्रणेपासून किंवा कर्ज देणाऱ्या बँकांपासून लपवून ठेवली होती, असे ईडीने स्पष्ट केले. या छाप्यात नवीन मालमत्तांचादेखील खुलासा झाला आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in