Hasan Mushrif ED Raids : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे; कागलमध्ये समर्थक आक्रमक

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीने छापेमारी सुरु केल्यानंतर समर्थक आक्रमक झाले
Hasan Mushrif ED Raids : हसन मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे; कागलमध्ये समर्थक आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर आज ईडीकडून (ED) छापेमारीला सुरुवात झाली आहे. त्यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले. सकाळी ६ वाजल्यापासून ईडीकडून ही कारवाई सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती मिळताच हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली असून कागलमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला. यावरून हसन मुश्रीफ यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यात घोटाळा झाल्याचे आरोप केले होते. यावरून हे छापे टाकण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे.

सकाळी ६ वाजता ईडीच्या एका पथकाने कोल्हापूरमधील हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर छापे टाकले. त्यानंतर पुण्यातील त्यांच्या घरावरही छापेमारी सुरु करण्यात आली. सकाळपासून हा तपास सुरु असून त्यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच, त्यांच्या सर्मथकांनी कागलमध्ये जमण्यास सुरुवात केली आणि गोंधळ करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, ही कारवाई सुडबुद्धीने करण्यात येत असल्याची देखील त्यांनी टीका केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in