हिरानंदानी समूहावर ईडीचे छापे

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी तपास सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध फेमाचे उल्लंघन केल्याची चौकशी सुरू
हिरानंदानी समूहावर ईडीचे छापे

मुंबई : परकीय चलन उल्लंघनाच्या आरोपावरून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या हिरानंदानी समूहाच्या मुंबईतील चार ते पाच संकुलांवर छापे टाकल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी तपास सुरू आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध फेमाचे उल्लंघन केल्याची चौकशी सुरू असून त्याच्याशी हिरानंदानी समूहावरील कारवाईशी संबंध नाही, असे सूत्रांनी सांगितले.

बडे उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून भेटवस्तू स्वीकारण्याच्या मोबदल्यात त्यांच्या आदेशावरून मोईत्रा लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी समूहाविरोधात प्रश्न उपस्थित करीत असल्याचा आरोप भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला होता.

आर्थिक लाभासाठी मोईत्रा राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करीत असल्याचा आरोपही दुबे यांनी केला होता. मात्र आपण कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, अदानी समूहाच्या व्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केल्यानेच आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा मोईत्रा यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in