परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीची छापेमारी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित ७ ठिकाणांवर ईडीने गुरुवारी धाडी घातल्या. सकाळी ६.३०च्या सुमारास ईडीने ही छापेमारी सुरू केली व जवळपास १२ तास चौकशी आणि तपास सुरू होता. दरम्यान, अनिल परबांविरोधात ईडीने मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे.

अनिल परब यांच्या वांद्र्यातील घरावरही ईडीने धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील त्यांच्या मालकीच्या जागांचीही तपासणी केली जात आहे. ईडीचे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले. एएनआयच्या वृत्तानुसार, अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमधील एकूण सात ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या आहेत.

गेल्या काही दिवसांत शिवसेनेच्या अनेक नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. आता अनिल परब यांच्यावर देखील ईडीने कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात केली आहे. मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीने परबांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. छापेमारी झाल्यानंतर ईडी त्यांना समन्स देखील बजावू शकते.

काय आहेत आरोप?

मनी लॉड्रिंगप्रकरणी यापूर्वीदेखील अनिल परबांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली आहे. परिवहन विभागातील बदल्यांमध्ये गैरप्रकार करून कोट्यवधींची कमाई केल्याचा आरोपही अनिल परबांविरोधात करण्यात आला आहे. याप्रकरणी आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांचीदेखील ईडीने चौकशी केली होती. ईडीची आजची कारवाई याच प्रकरणाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप ईडीकडून याप्रकरणी अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याशिवाय बेनामी संपत्तीप्रकरणी काही दिवसांपूर्वीच आयकर विभागाने परब यांच्याशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात दापोलीतील रिसॉर्टचादेखील समावेश होता. तसेच खरमाटे आणि वांद्रेतील परबांच्या सीएच्या घरीदेखील धाड टाकण्यात आली होती.

अनिल परबांना तुरूंगात

जावे लागणार - सोमय्या

परिवहन मंत्री अनिल परब यांनाही आता तुरूंगाची हवा खावी लागेल. त्यांनी आता त्यासाठी तयार रहावे, असा इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ‘मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे तुरूंगात गेले. आता परब यांची वेळ आली आहे,’ असेही ते म्हणाले.

ईडीमुळे भाजप रोज खड्ड्यात

जातोय - संजय राऊत

महाविकास आघाडी परिवहन मंत्री अनिल परबांच्या पाठिशी आहे. ईडीच्या कारवायांमुळे भाजप रोज खड्ड्यात जातोय, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी परब यांच्यावरील धाडीनंतर केली.

शिवसैनिकांची परबांच्या

घराबाहेर घोषणाबाजी

ईडीच्या धाडीची खबर लागताच अनिल परबांच्या वांद्रे येथील निवासस्थानी शिवसैनिक जमले. परबांवरील कारवाईविरोधात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली व काळ्या फिती लावून निषेध करण्यात आला. शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहून पोलिसांनी येथील बंदोबस्त वाढवला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in