ED ने जप्त केलेल्या चित्रपटगृहाच्या जागेची विक्री; इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक

दक्षिण मुंबईतील चित्रपटगृह पाडून त्या चित्रपटगृहाची जागा १५ कोटींना विक्रीस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या एका साथीदाराला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही मालमत्ता मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्त केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ED ने जप्त केलेल्या चित्रपटगृहाच्या जागेची विक्री; इक्बाल मिर्चीच्या साथीदाराला अटक
Published on

मुंबई : दक्षिण मुंबईतील चित्रपटगृह पाडून त्या चित्रपटगृहाची जागा १५ कोटींना विक्रीस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्चीच्या एका साथीदाराला अटक केली आहे. विशेष म्हणजे ही मालमत्ता मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तात्पुरती जप्त केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अब्दुल कादिर अली मोहम्मद (७५) असे अटक केलेल्या इसमाचे नाव असून, बुधवारी व्ही. पी. रोड पोलिसांनी त्याला अटक केली, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गिरगाव येथील 'न्यू रोशन टॉकीज' हे थिएटर ईडीने जप्त केले होते. या चित्रपटगृहाला अनधिकृतरीत्या पाडण्यात आले आणि त्याची विक्री करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

याप्रकरणी अब्दुलविरोधात फसवणूक, बेकायदेशीर प्रवेश आणि खोटेगिरी आदी आरोपांखाली भारतीय न्यायसंहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे थिएटर २०२० साली ईडीने जप्त केले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.

ईडीच्या अधिकाऱ्यांना शंका आहे की, अब्दुलने मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून ती जागा ती जागा आपल्या नावे करून घेतली. अब्दुल आणि मिर्ची यांनी ही मालमत्ता ६ लाख रुपयांना संयुक्तपणे विकत घेतली होती, त्यातील बहुतांश आर्थिक हिस्सा अब्दुलने दिला होता, अशी माहितीही देण्यात आली.

अब्दुलला स्थानिक न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

logo
marathi.freepressjournal.in