

मुंबई : उद्योजक अनिल अंबानी यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंतच्या ३०८० कोटी रूपयांच्या किंमतीच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे. ईडीने रविवारी अंबानी यांच्या देशभरातील विविध संपत्तीवर तात्पुरत्या जप्तीची कारवाई केली.
अनिल अंबानी यांच्या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील पाली हिल येथील बंगला, दिल्लीमधील रिलायन्स सेंटरचे कार्यालय त्याचबरोबर दिल्ली, नोएडा, गाजियाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, हैदराबाद, चेन्नई, कांचीपूरम आणि गोदावरीमधील संपत्तीवर ईडीने मोठी कारवाई केली आहे.
अनिल अंबानी आणि त्यांच्या समूहाच्या कंपनीवर कथित फसवणुकीत ईडीने कारवाई केली. दिल्लीतील हॉटेल रणजीत येथे असलेले रिलायन्स सेंटरही जप्त करण्यात आले आहे.