आमदार रवींद्र वायकरांना ईडीचे समन्स; मंगळवारी होणार चौकशी

महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रखरणी होणार आहे
आमदार रवींद्र वायकरांना ईडीचे समन्स; मंगळवारी होणार चौकशी
Published on

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना ईडीने समन्स पाठवले आहे. जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मंगळवारी त्यांची चौकशी होणार असल्यामुळे वायकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ईडीने त्यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यावेळी ईडीने पाठवलेल्या समन्सनंतर ते चौकशीसाठीही गेले नव्हते. आता दुसऱ्यांदा त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील तीन नेत्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. आमदार रवींद्र वायकर यांची जोगेश्वरी भूखंड प्रखरणी होणार आहे, तर बारामती अॅग्रोप्रकरणी रोहित पवार यांची बुधवारी ईडी चौकशी करणार असून गुरुवारी ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे.

जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १७ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होण्यासाठी समन्स जारी केले होते. मात्र, वायकर ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. याउलट चौकशीस हजर राहण्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदतवाढ मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणी अलीकडेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी वायकर यांचे निवासस्थान, मातोश्री क्लब तसेच त्यांच्या व्यावसायिक भागीदारांच्या निवासस्थानी अशा एकूण ७ ठिकाणी छापेमारी केली होती.

logo
marathi.freepressjournal.in