रोहित पवार यांना ईडीचे समन्स

. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात सध्या रोहित पवार चर्चेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती.
रोहित पवार यांना ईडीचे समन्स

मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना शुक्रवारी ईडीने समन्स बजावला आहे. रोहित पवार यांना २४ जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटिशीस देण्यात आले आहेत. याआधी देखील केंद्रीय यंत्रणांकडून रोहित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणात नोटीस बजावण्यात आली होती. तसेच नुकतेच त्यांच्या बारामती ॲग्रोशी संबंधित कारखान्यांवर ईडीचे छापे पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात सध्या रोहित पवार चर्चेत आहेत. मागील अनेक दिवसांपासून रोहित पवारांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू होती. पण, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नव्हते. ‘‘मी ज्याप्रकारे वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करतोय, त्यामुळे माझ्यावर केंद्रीय यंत्रणांचा दबाब आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रोहित पवारांकडून वारंवार सांगण्यात येत होते. त्यामुळे आता या सगळ्या घडामोडींवर रोहित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, रोहित पवारांना ईडीची नोटीस बजावल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांना याआधी देखील नोटीस आली होती, असे म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in