एलफिस्टन येथील ईडनवाला इमारत धोकादायक ;६० कुटुंबीयांचा जीव टांगणीला

पालिकेने भाडेकरूंना तातडीने अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अन्यथा इमारत कधीही कोसळू शकते आणि इमारतीच्या जवळपास राहणाऱ्यांना धोका पोहोचू शकतो
एलफिस्टन येथील ईडनवाला इमारत धोकादायक ;६० कुटुंबीयांचा जीव टांगणीला

मुंबई : एलफिस्टन येथील जे. बी. मार्गावरील ८५/९५ अ ईडनवाला इमारतीत राहणाऱ्या ६० रहिवासी कुटुंबीयांचा जीव टांगणीला लागला आहे. ही इमारत सी-ए श्रेणी अंतर्गत येत असून आतापर्यंत येथे प्रकल्प सुरू होण्यास विलंब झाल्यामुळे तेथे राहणाऱ्या भाडेकरूंना धोका निर्माण झालेला आहे. या भाडेकरूंचे तातडीने स्थलांतरित करावे आणि त्यांचा जीव वाचवावा, असे आवाहन रहिवाशांनी केले आहे. या इमारतीत एकूण ६० कुटुंबे राहत असून त्यांनी या प्रकल्पाला होत असलेल्या दिरंगाईबाबत पालिकेच्या जी साऊथ विभाग कार्यालयाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

पालिकेने भाडेकरूंना तातडीने अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे, अन्यथा इमारत कधीही कोसळू शकते आणि इमारतीच्या जवळपास राहणाऱ्यांना धोका पोहोचू शकतो, अशी माहिती श्रीदत्त सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या उपाध्यक्षा दीपिका भास्कर यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in