अंडी महागली ;एक डझन अंड्याला ९० ते १०० रुपये भाव

आता उत्पादन घटल्याने डझनाचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या अंडी ९० ते १०० रुपये डझनने विकली जात आहेत.
अंडी महागली ;एक डझन अंड्याला ९० ते १०० रुपये भाव

मुंबई : राज्यात सध्या थंडीची चाहूल लागली असून काही भागात तापामानात घसरण झाली आहे. थंडीला सुरुवात होताच सर्वसामान्यांच्या जेवणातील प्रमुख घटक असलेल्या अंड्यांच्या दरात वाढ झाली आहे. अंड्यांच्या किंमतीत प्रतिनग दोन ते तीन रुपयांपर्यंत वाढ झाली असून एक डझन अंड्यासाठी आता ९० ते १०० रुपये मोजावे लागत आहेत.

अंडी ही उष्ण असल्यामुळे शरीराला उष्णता मिळावी, यासाठी हिवाळ्यात प्राधान्याने अंड्यांचे सेवन केले जाते. त्याचबरोबर थंडीत अंड्यांचे उत्पादन कमी होत असल्याने आणि मागणी जास्त असल्याने सर्रास अंड्यांच्या किंमतीत वाढ होते. तसेच कोंबडीचे खाद्य महागल्याने देखील अंड्याचे भाव वाढले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांचा हा प्रोटिनयुक्त आहार महागण्याची चिन्हे आहेत.

किरकोळ बाजारात अंड्याच्या दरात वाढ झाली आहे. पाच रुपये नग याप्रमाणे मिळणाऱ्या अंड्याचे दर आता वाढले आहे. त्यामुळे प्रतिडझन ९० रुपयांनी अंड्याची विक्री होत आहे. काही दिवसांत दर आणखीन वाढून चे शंभरी गाठण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी होलसेल बाजारात १६० रुपयांना ३० अंड्यांचा ट्रे मिळत होता. मात्र, ३० अंड्यांच्या ट्रेसाठी आता १८० रुपये मोजावे लागत आहे. मात्र, आता उत्पादन घटल्याने डझनाचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. सध्या अंडी ९० ते १०० रुपये डझनने विकली जात आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in