ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी ; मुंबईतील मुस्लिम समुदायाचा 'मोठा' निर्णय

मुस्लिम समुदायाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वस्तातून कौतूक होताना दिसत आहे.
ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी ; मुंबईतील मुस्लिम समुदायाचा 'मोठा' निर्णय

मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी येत आहे. या पार्श्वभूमीर मुंबईतील मुस्लिम धर्मीयांकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा ईद-ए-मिलादच्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत. मुस्लिम समुदायाने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वस्तातून कौतूक होताना दिसत आहे.

हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने मोठ्या प्रमाणार लोक रस्त्यावर येऊन मोठा गोंधल निर्माण होण्याची शक्यता होती. तसंच वाहतूक कोंडी देखील होण्याची शक्यता होती. यामुळे दोन्ही समुदायातील बंधुत्व जोपासण्याच्या उद्देशाने तसंच दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पडावेत या उद्देशाने ईद-ए-मिलादच्या निवडणूका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. भायखळा येथील खिलाफत हाऊस याठिकाणी मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समुदाची बैठक पार पडली. त्यात ईद-ए-मिलाद २९ सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते ारिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदारा रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सिद्दीकी यांची उपस्थिती होती.

logo
marathi.freepressjournal.in