ईदची सार्वजनिक सुट्टी रद्द; सर्व बँका राहणार सुरू

यंदा ईदच्या दिवशीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. दरवर्षी ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईदच्या दिवशी देशभरातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असते.
ईदची सार्वजनिक सुट्टी रद्द; सर्व बँका राहणार सुरू
Published on

मुंबई : यंदा ईदच्या दिवशीही सर्व बँका सुरू राहणार आहेत. दरवर्षी ‘ईद-उल-फित्र’ अर्थात रमजान ईदच्या दिवशी देशभरातील सर्व बँकांना सार्वजनिक सुट्टी असते. मात्र, यंदा ईद ३१ मार्च रोजी आल्याने आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आणि आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील सर्व नोंदी पूर्णत्वास नेण्यासाठी या दिवशी ३१ मार्चला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत.

रमजान ईदच्या दिवशी हिमाचल प्रदेश आणि मिझोराम ही दोन राज्ये वगळता सर्व राज्यांमध्ये ३१ मार्च रोजी बँकांना सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, यंदा ३१ मार्चच्याच दिवशी ईद आल्याने बँकांपुढे मोठा पेच निर्माण झाला होता. आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील सर्व आर्थिक व्यवहार योग्यरित्या आणि वेळेत नोंदवले जावे यासाठी ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in