राणीबागेत नवीन पाहुणे लवकरच येणार; पर्यटकांना सुसर-मगर पाहण्याचा आनंद लुटता येणार

देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राणीबागेत रोज आठ ते १० हजार पर्यटक भेट देतात
राणीबागेत नवीन पाहुणे लवकरच येणार; पर्यटकांना सुसर-मगर पाहण्याचा आनंद लुटता येणार
Published on

पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकर नवीन सुसर, मगर पर्यटकांच्या भेटीला येणार आहेत. चेन्नईच्या क्रोकोडाईल बँकमधून पाच, कोल्हापूर प्राणिसंग्रहालयामधून चार अशा नऊ मगर, तर ओदिशामधील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातून आठ सुसर लवकरच आणल्या जाणार आहेत. या मगरी कमी वयाच्या असून पर्यटकांना काचेच्या पिंजऱ्याजवळून या मगरींना पाहण्याचा आनंद लुटता येईल, अशी माहिती प्राणिसंग्रहालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राणीबागेत रोज आठ ते १० हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या तर २५ हजारांच्या घरात पोहोचते. पर्यटकांची वाढती संख्या आणि पर्यटकांना नवनवीन पशूपक्ष्यांचा आनंद लुटता यावा, यासाठी नवनवीन पशूपक्षी आणण्यावर जोर दिला जात आहे. सद्य:स्थितीत राणीबागेत दोन मगरी आणि पाच सुसरी आहेत; मात्र पिंजऱ्याचे काम सुरू असल्याने सध्या त्यांना अलिप्त व पर्यटकांपासून दूर असलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. या मगरी आणि सुसरी वयाने मोठ्या असल्याने त्या फारशा हालचाली करत नाहीत; मात्र पिंजऱ्याचे काम सुरू असल्याने सध्या त्यांना अलिप्त व पर्यटकांपासून दूर असलेल्या पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे नवीन मगरी आणल्या जाणार आहेत. चेन्नईच्या क्रोकोडाईल बँकमधून पाच, कोल्हापूर प्राणिसंग्रहालयामधून चार अशा नऊ मगर, तर ओदिशातील नंदनकानन प्राणिसंग्रहालयातून आठ सुसर आणण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in