मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, असा दावा भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत अधिकाधिक जागा निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबई महापालिकेवर फोकस केला आहे. एकनाथ शिंदे सेनेने रणनीती आखली असून ३२ प्रभारी विभागप्रमुख व ३ विधानसभा प्रमुखांची टीम मैदानात उतरवली आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी पालिकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या पक्षांचे संख्याबळ अधिक त्याचा महापौर होणार यासाठी भाजप व शिवसेना छुपी चाल खेळत आहे. भाजपचा महापौर व्हावा यासाठी भाजप नेते कामाला लागले असून शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळाव्यात यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली आहे. पालिका निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहोचत त्यांच्या अपेक्षा जाणून घेणे, त्यांच्या समस्या सोडवणे यासाठी शिवसेनेने ३२ प्रभारी विभागप्रमुख व ३ विधानसभा प्रमुख यांची नियुक्ती केली आहे.
प्रभारी विधानसभा प्रमुख
दिंडोशी गोरेगाव - गणेश शिंदे
विलेपार्ले - जितू जनावडे
वांद्रे पश्चिम - विलास चावरी