Ekanath Shinde: चौथ्या महिला धोरणाची अंमलबजावणी होणार; सक्षम वातावरणनिर्मिती करणार

चौथे महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने प्रभावीपणे काम करावे. धोरणाच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे. मुंबईसाठी महिलांसाठी असलेल्या योजना एकाच ठिकाणी माहिती मिळण्यासाठी नवीन अॅप तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
CM Eknath Shinde
संग्रहित फोटो
Published on

मुंबई : चौथे महिला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विभागाने प्रभावीपणे काम करावे. धोरणाच्या माध्यमातून महिला व मुलींसाठी सक्षम वातावरण तयार करत आहे. मुंबईसाठी महिलांसाठी असलेल्या योजना एकाच ठिकाणी माहिती मिळण्यासाठी नवीन अॅप तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

मुंबई शहर येथे चौथे महिला धोरण-२०२४ जिल्हास्तरीय अंमलबजावणी सुकाणू समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई शहरातील लोकसंख्या लक्षात घेऊन येथील नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, लहान मुलांसाठी पाळणाघर, झोपडपट्टी भागात तसेच इतर गरजू असतील त्या ठिकाणी महिला बचत गट स्थापन करणे, बचतगटांना रोटेशन पध्दतीने स्टॉल उपलब्ध करून देणे, महिलांचा पर्यटन क्षेत्रात सहभाग वाढावा यासाठी पर्यटनाचे प्रकल्प विकसित करणे, महिला मच्छिमारांसाठी शासकीय योजना राबविणे यावर भर देण्यात यावा. आदिवासी महिलांसाठी असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवा. घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी नियोजित असलेले प्रकल्प वेळेत पूर्ण करणे, महिलांना आरोग्यसुविधा देणे तसेच काळानुरूप आरोग्यसुविधा वाढविणे याबाबत काम करावे.

logo
marathi.freepressjournal.in