तेव्हा उद्धव ठाकरे नोटा मोजत होते - एकनाथ शिंदे

त्यांना माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.
तेव्हा उद्धव ठाकरे नोटा मोजत होते - एकनाथ शिंदे

"कोरोना काळात जे तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाइव्ह करत होते. त्यांना माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. कोरोना काळात मी पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत फिरत होतो. त्यावेळी हे घरात बसले होते. एकीकडे कोरोनाने माणसं मरत होती आणि हे घरात बसून नोटा मोजण्याचे काम कर होते" असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. ज्यांनी बॉडीबॅग, खिचडी, औषधांची खरेदी यात घोटाळा केला तो समोर येईल. नांदेडमधे औषध खरेदीत जर घोटाळा झाला असेल, हलगर्जीपणा झाला असेल, तर त्यावर नक्की कारवाई होईल. नांदेड घटनेची सगळी चौकशी होऊ दे, दोषींना पाठीशी घालणार नाही, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in