एकनाथ शिंदेंना व्हीपच मिळाला नव्हता आमदार अपात्रता सुनावणी : ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय होणार

आमच्याकडे एकनाथ शिंदे यांना मेलवर व्हीप मिळाल्याचा पुरावा असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले.
एकनाथ शिंदेंना व्हीपच मिळाला नव्हता आमदार अपात्रता सुनावणी : ३१ डिसेंबरपर्यंत निर्णय होणार

मुंबई :शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर पार पडली. अपात्रतेच्या खटल्यात पक्षादेश म्हणजे व्हीपचा मुद्दा कळीचा ठरणार आहे. हा व्हीपच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालाच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. शिवसेना ठाकरे गटाकडून यासंदर्भात पुरावे सादर करण्यासाठी अर्ज करण्यात आला. याला शिंदे गटाकडून विरोध करण्यात आला असून अध्यक्षांनी याबाबतचा निर्णय राखून ठेवला आहे. यावर २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय घेण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी २१ नोव्हेंबरपासून नियमित सुनावणी होईल. ६ नोव्हेंबरपर्यंत सर्व कागदपत्रे, १६ नोव्हेंबरपर्यंत सर्व पुरावे सादर करावेत. ३१ डिसेंबरपर्यंत मला निर्णय द्यायचा आहे, त्यासाठी दोन्ही गटांकडून मला सहकार्य लागेल. अधिवेशन काळातही सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्षांसमोर गुरुवारी विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास सुनावणीला सुरुवात झाली. व्हीपसंदर्भातील याचिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना व्हीप मिळालाच नसल्याचा दावा करण्यात आला होता. शिंदे गटाच्या या याचिकेवर पुरावे सादर करण्यासाठी ठाकरे गटाकडून अर्ज करण्यात आला. शिंदे गट जर व्हीप मिळाला नाही असे म्हणत असेल तर त्यांनी त्याविषयीचे पुरावे सादर करावेत अन्यथा व्हीप मिळाल्याचे पुरावे सादर करतो, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

आमच्याकडे एकनाथ शिंदे यांना मेलवर व्हीप मिळाल्याचा पुरावा असल्याचे ठाकरे गटाने स्पष्ट केले. संबंधित ई-मेल आयडी आपला नसल्याचे त्यांनी कधीही सांगितले नाही. म्हणजे सर्वच आमदारांना व्हीप मिळाला. आयडी त्यांचाच असेल तर व्हीप मिळाला नाही हे सांगणे गंभीर आहे. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. संबंधित सर्व आमदारांना ई-मेलद्वारे व्हिप दिला गेला आहे. ते नकार देत असतील तर मग त्यांनी आपले ई-मेल आयडी नसल्याचे सांगावे आणि कोणता आहे ते सांगावे. शिंदेंचा मेल आयडी त्यांच्या ताब्यात नसेल तर मेल फिशिंग झालेला असू शकतो, याशिवाय २१ जणांच्या ई-मेल आयडीवरही व्हीपचा मेल आला नाही असे ते सांगतात, तसे असेल तर त्याची खातरजमा आयटी तज्ज्ञांकडून करता येईल. मुळात विजय जोशी यांच्या ई-मेलवरून एकनाथ शिंदे यांना व्हीप मेलवरून पाठवला होता, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला.

दरवेळी नवी कागदपत्रे आणू नका

विजय जोशी कोण आहेत? मला माहिती नाही, अशी भूमिका शिंदे गटाचे वकील अनिल सिंग यांनी मांडली. ठाकरे गटाला पुरावे सादर करण्यास विरोध करताना तुम्ही तुमच्या याचिकेत कागदपत्रे जोडली नाहीत, ही तुमची चूक आहे. दरवेळेस तुम्ही नवीन कागदपत्रे सादर करू शकत नाही. दरवेळेस कागदपत्रे जोडली तर हे कधीच थांबणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in