एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना सोडली हे मान्य केले तर आमदारकी जाईल म्हणून ते शिवसेना सोडली असे सांगत नाहीत.
एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री, संजय राऊत यांचा घणाघात
Published on

शिवसेनेचा मुख्यमंत्री दिल्लीत जात नाही, एकनाथ शिंदे हे भाजपचे मुख्यमंत्री आहेत, त्यांचे हायकमांड दिल्लीत आहे. मुंबईचे तुकडे करण्याचा भाजपचा विचार लपून राहिलेला नाही, त्या दृष्टीने त्यांचे काम सुरू आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मातोश्रीवर आहेत, आम्हाला मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीत जावे लागत नाही, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघात केला.

“शिवसेना सोडली हे मान्य केले तर आमदारकी जाईल म्हणून ते शिवसेना सोडली असे सांगत नाहीत. शिवसेनेत आहोत, असे दाखवण्यासाठी ठाकरे कुटुंबियांवर टीका करू नका, असे केवळ भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न शिंदे गटातील लोक करत आहेत. बंडखोरांनी राजीनामा द्यावा आणि मग काहीही बोलावे. ही आमदारकी त्यांना शिवसेनेमुळे मिळाली आहे. त्यांना शिवसेनेत राहायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. बंडखोर भाजपमध्ये तन, मन, धनाने विलीन झाले आहेत,” असेही राऊत म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in