एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गृहराज्यमंत्री दोन तास वेटींगवर; चुकीचे नाही तर घाबरण्याची गरज नाही - शिंदे

पुण्यातील गुंड निलेश घायवाळ यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या रडारवर आले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम गुरुवारी रात्री मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर त्यांची भेट झाली. दरम्यान, तुम्ही चुकीचे काही केले नाही तर घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत एकनाथ शिंदेंनी कदम यांना दिलासा दिला.
एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गृहराज्यमंत्री दोन तास वेटींगवर; चुकीचे नाही तर घाबरण्याची गरज नाही - शिंदे
Published on

मुंबई : पुण्यातील गुंड निलेश घायवाळ यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम विरोधकांच्या रडारवर आले आहेत. गुंड निलेश घायवाळ यांना शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी योगेश कदम यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी लावून धरली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम गुरुवारी रात्री मुक्तागिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले. मात्र रात्री उशिरा भेट न झाल्याने कदम यांनी शुक्रवारी सकाळी मुक्तागिरी बंगला गाठला. मात्र दोन तासांच्या प्रतिक्षेनंतर कदम यांची एकनाथ शिंदे यांची भेट झाली. दरम्यान, तुम्ही चुकीचे काही केले नाही तर घाबरण्याचे कारण नाही, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी कदम यांना दिलासा दिला.

गेल्या काही दिवसांपासून गुंड निलेश घायवळ प्रकरण चांगलेच तापले आहे. घायवळ याच्यामुळे भाजपा नेते तथा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला आहे. गुन्हेगारी विश्वात जगतात निलेश घायवळची चर्चा रंगलेली असतानाच त्याच्या भावाची म्हणजेच सचिन घायवळ याला पोलिसांची परवानगी नसताना सुद्धा गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या सहीने शस्त्रपरवाना देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळळ उडाली आहे. पण यामुळे गृहराज्यमंत्री योगेश कदमांची चांगलीच कोंडी झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही ही गोष्ट पटली नसल्याची चर्चा आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज शुक्रवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यात गेले होते. पण साधारण दोन तास कदमांना मुक्तागिरी या बंगल्यावर शिंदेची वाट पाहावी लागली. योगेश कदम हे गृहखात्याचे राज्यमंत्री आहेत, पण असे असतानाही शिंदेंनी कदमांना तत्काळ भेटण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

logo
marathi.freepressjournal.in