मुंबई : ट्रॉम्बे येथे मोठ्या भावावर लहान भावाने चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यात अरबाज रेहमतअली खान हा गंभीररीत्या जखमी झाला असून, त्याच्यावर शीव हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. हल्ल्यानंतर पळून गेलेला लहान भाऊ सेहबाज रेहमत अली खान याच्याविरुद्ध ट्रॉम्बे पोलिासांनी गुन्हा दाखल केला आहे. खान कुटुंबीय ट्रॉम्बे येथे राहतात. अरबाज हा मॅनेजमेंटचे काम करतो, तर त्याचा लहान भाऊ सेहबाज हा काहीच काम करत नाही. दोन दिवसांपूर्वी सेहबाजने एका लहान मुलाशी भांडण झाले होते.
त्यामुळे अरबाजने त्यांच्या भांडणात मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर अरबाजने त्याला घरी नेण्याचा प्रयत्न केला होता; मात्र अरबाजने मध्यस्थी केल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यातून रागाच्या भरात त्याने त्याने अरबाजवर चाकूने वार केले होते. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला आधी शताब्दी आणि नंतर शीव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.