मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये धावताना रविवारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. राजेंद्र चांदमल बोरा यांनी सकाळी ६ वाजता मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी घर सोडले. मॅरेथॉन सकाळी ८ वाजता मरीन ड्राईव्हवर पोहोचली. तेथे अचानक बोरा कोसळले. त्यांना तत्काळ बॉम्बे रुग्णालयात दाखल केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉ. अमित नांदोस्कर यांनी सांगितले.