पवई येथील अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू; अपघातानंतर बाईकस्वाराचे घटनास्थळाहून पलायन

पवई येथील अपघातात एका ८५ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. पद्मसिंह धनसिंह नेपाळी असे या मृत वयोवृद्धाचे नाव असून अपघताानंतर आरोपी बाईकस्वार पळून गेला आहे.
पवई येथील अपघातात वयोवृद्धाचा मृत्यू; अपघातानंतर बाईकस्वाराचे घटनास्थळाहून पलायन
Published on

मुंबई : पवई येथील अपघातात एका ८५ वर्षांच्या वयोवृद्धाचा मृत्यू झाला. पद्मसिंह धनसिंह नेपाळी असे या मृत वयोवृद्धाचे नाव असून अपघताानंतर आरोपी बाईकस्वार पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध पवई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी दोन वाजता पईतील मनुभाई चाळ, बुद्धविहारसमोरील लुबिनीजवळ झाला.

पद्मसिंह नेपाळी हे पवईतील चांदीवली परिसरात वयोवृद्ध पत्नीसोबत राहतात. शुक्रवारी कामानिमित्त बँकेत जात असताना भरवेगात जाणाऱ्या बाईकने त्यांना धडक दिली. त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचारादरम्यान सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. पवई पोलिसांनी नेपाळी यांच्या सूनेच्या तक्रारीवरून आरोपी बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in