सांताक्रुज येथे वयोवृद्ध डॉक्टरची सायबर ठगाकडून फसवणुक

रिफंडसाठी कस्टमर केअरला कॉल करुन तक्रार करणे या वयोवृद्ध डॉक्टरला १ लाख ६९ हजारांना पडले
सांताक्रुज येथे वयोवृद्ध डॉक्टरची सायबर ठगाकडून फसवणुक

मुंबई : सांताक्रुज येथे एका ७० वर्षांच्या वयोवृद्ध डॉक्टरची दोन अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली आहे. कस्टमर केअरला कॉल करुन ब्रोकरच्या नोंदणीसाठी जमा केलेल्या रिफंडसाठी तक्रार करणे या डॉक्टरला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. वयोवृद्ध तक्रारदार व्यवसाायने डॉक्टर असून त्यांच्या मालकीचे एक हॉस्पिटलमध्ये आहे. सांताक्रुज येथे त्यांचा एक फ्लॅट असून या फ्लॅटमध्ये त्यांना भाडेकरु ठेवायचा होता. त्यासाठी त्यांनी नो ब्रोकर्स डॉट कॉमवर नोंदणी केली होती. त्यासाठी त्यांनी ७६९९ रुपये जमा केले होते. मात्र त्यांच्याकडून त्यांना भाडेकरु मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतच प्रयत्न करुन त्यांच्या फ्लॅटमध्ये एक भाडेकरु ठेवला होता. नो ब्रोकर्स डॉट कॉम या संकेतस्थळावर जमा केलेली रक्कम परत मागण्यासाठी त्यांनी कस्टमर केअरला फोन करुन त्यांच्या रिफंडची मागणी केली होती. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांना आम्हाला दिलेल्या कोटेशनपेक्षा कमी किंमतीत भाडेकरु ठेवला असले तर त्यांना पैसे परत मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी नो ब्रोकर्स डॉट कॉम या संकेतस्थळाची तक्रार करण्यासाठी पुन्हा गुगलवर एक क्रमांक शोधून काढून तिथे संपर्क साधला होता. यावेळी त्यांना समोरील व्यक्तीने दोन रुपये फि भरण्यास सांगितले. त्याने त्यांच्या मोबाईलवर एक लिंक पाठविली होती. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन करुन दोन रुपये ट्रान्स्फर केले. यावेळी दुसर्‍या व्यक्तीने त्यांना दोन रुपये मिळाले नसून दुसर्‍या बँक खात्यातून पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे पाठविले. तीन दिवसांपूर्वी ते त्यांच्या घरी असताना त्यांना त्यांच्या दोन्ही बँक खात्यातून ९९ हजार ९९९ आणि ७० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्स्फर झाल्याचा मॅसेज आला होता. संकेतस्थळाची तक्रार करण्यासाठी गुगलवरुन शोधून काढलेल्या क्रमांकाच्या कस्टमर केअरच्या संबंधित दोन व्यक्तींनी लिंक पाठवून ही फसवणुक केल्याचे नंतर त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार वाकोला पोलिसांना सांगून तिथे दोन्ही सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ७६९९ रुपयांच्या रिफंडसाठी कस्टमर केअरला कॉल करुन तक्रार करणे या वयोवृद्ध डॉक्टरला १ लाख ६९ हजारांना पडले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in