वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून खंडणीसाठी धमकी

पाचही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशच्या गाझीयाबाद व गोरखपूरचे रहिवाशी आहेत.
वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून खंडणीसाठी धमकी

मुंबई : कफ परेड येथे राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक करून तिला खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तिघांना उत्तरप्रदेश व दिल्लीतून कफ परेड पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. गौतम गोपाल मोहन वर्मा, रेहमततुल्ला नबीउल्ला खान, अख्तर शफी अहमद हुसैन अशी या तिघांची नावे असून, अटकेनंतर या तिघांनाही किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पोलिसांनी बसंत दिल्लीराम शर्मा ऊर्फ संजयकुमार पुरचंद उपरेती आणि हेमंत रमाकांत शर्मा या दोघांना अटक केली होती. पाचही आरोपी मूळचे उत्तरप्रदेशच्या गाझीयाबाद व गोरखपूरचे रहिवाशी आहेत. या गुन्ह्यांत गयासुद्दीन ऊर्फ शानू, धनश्याम, प्रितम सिंग, अर्जुन सिंग, अनशूलसह इतरांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in