फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात वयोवृद्ध महिलेची फसवणूक

दहा लाख जावेदला तर उर्वरित वीस लाख सुरेंद्रनाथ गुप्ता यांना देण्याचे ठरले होते
फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात वयोवृद्ध महिलेची फसवणूक
Published on

मुंबई : फ्लॅट खरेदी-विक्री व्यवहारात एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची सुमारे ३५ लाखांच्या फसवणुकीच्या कटातील वॉण्टेड फ्लॅटमालकाला दहा महिन्यांनी चारकोप पोलिसांनी अटक केली. ज्योतीरमय्या सुरेंद्रनाथ गुप्ता असे या आरोपी मालकाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यांत त्याची पत्नी गिता गुप्ता आणि इस्टेट एजंट जावेद खान हे सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. फ्लॅटवर आधीच बॅकेत कर्ज असताना ही माहिती लपवून त्यांनी फ्लॅट खरेदी-विक्रीचा व्यवहार करून ही फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदार वयोवृद्ध महिला ही चारकोप परिसरात राहत असून, तिने जावेद खानच्या ओळखीने सुरेंद्रनाथ ज्वालाप्रसाद गुप्ता यांचा फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. ते आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी फ्लॅटची विक्री करायची होती. स्वस्तात फ्लॅट मिळत असल्याने ती फ्लॅट घेण्यास तयार झाली होती. फ्लॅटची किंमत तीस लाख रुपये होती, त्यापैकी दहा लाख जावेदला तर उर्वरित वीस लाख सुरेंद्रनाथ गुप्ता यांना देण्याचे ठरले होते. त्यामुळे तिने जावेदला दहा लाख ५० हजार रुपये दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in