इमारतीवरून उडी मारून वृद्धे महिलेची आत्महत्या

मंगला राठोड या कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, सरोवा टॉवर इमारतीच्या नवव्या मजल्यावर पती आणि तीन मुलांसोबत राहत होत्या.
इमारतीवरून उडी मारून वृद्धे महिलेची आत्महत्या

मुंबई : मानसिक नैराश्यातून एका ६० वर्षांच्या वृद्ध महिलेने नवव्या मजल्यावरील आपल्या राहत्या घरातील खिडकीतून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. मंगला प्रवीण राठोड असे या मृत महिलेचे नाव असून तिच्या कुटुंबीयांची जबानी नोंदविण्यात आली आहे. त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे कांदिवली पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

मंगला राठोड या कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज, सरोवा टॉवर इमारतीच्या नवव्या मजल्यावर पती आणि तीन मुलांसोबत राहत होत्या. त्यांच्या लहान मुलाने प्रेमविवाह केला आणि तो त्याच्या पत्नीच्या घरी राहण्यासाठी गेला होता. तेव्हापासून त्या मानसिक तणवात होत्या. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजता घरात कोणीही नसताना उडी मारली होती. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच स्थानिक रहिवाशांनी समतानगर पोलिसांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वृद्धे महिलेला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. यापकरणी मंगलाचे पती तसेच मुलांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली असून या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी कोणावर संशय व्यक्त केला नाही. त्यामुळे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in