
मुंबई : मुंबईतील कफ परेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या संध्या नरेश निंबाळकर या वयोवृद्धेचे निधन झाले आहे. याप्रकरणी कफ परेड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मयत महिला संध्या नरेश निंबाळकर या ट्रांजिस्ट कॅम्प, बिल्डिंग नंबर 36 मागे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, कफ परेड येथे गेल्या २५ वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. मयत महिलेचे शव जीटी हॉस्पिटलमध्ये शवशीतगृहात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या मालकीचे रूम योग्य वारसाकडे हस्तांतरित करण्यासाठी मयत महिला संध्या निंबाळकर यांचे कोणी नातेवाईक किंवा आप्तेष्ट असतील त्यांनी कफ परेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चोगले मो. नं. ९०२९२६८८२७ यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन कफ परेड पोलिसांनी केले आहे.