एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक, सीएनजी बसगाड्या येणार

बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याच्या आदेशासोबत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश शिंदे यांनी दिले.
एसटीच्या ताफ्यात इलेक्ट्रिक, सीएनजी बसगाड्या येणार

एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत १ हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार असून त्याद्वारे प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले. एसटी महामंडळासह ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाचा आढावा घेतला. यावेळी बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घेण्याच्या आदेशासोबत अनेक महत्त्वपूर्ण निर्देश शिंदे यांनी दिले.

या बैठकीत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांचेसह राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार या बैठकीस उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in