अर्जानंतर तीन दिवसांत वीजजोडणी करण्यात येणार

अदानी इलेक्टि्रसिटी मुंबईच्या नवरात्री/ दुर्गापूजा उत्सवाचा एक भाग होण्यासाठी सज्ज आहे.
अर्जानंतर तीन दिवसांत वीजजोडणी करण्यात येणार
Published on

अदानी इलेक्टि्रसिटी मुंबई लिमिटेडने (अदाणी इलेक्िट्रसिटी) ग्राहकांना सणासुदीच्या शुभेच्छा देत नवरात्री आणि येणारा सणांचा हंगाम सुरक्षितपणे साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. नवरात्री/दुर्गा पूजा मंडपांना तात्पुरती वीजजोडणीसाठी अदानी इलेक्िट्रसिटी त्यासाठीचा अर्ज प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत ती उपलब्ध करून देत आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार अशा मंडपांसाठी लागू होणारे दर हे निवासी श्रेणीतील दराचे आर्थिक दर असतील. अदानी इलेक्टि्रसिटी मुंबईच्या नवरात्री/ दुर्गापूजा उत्सवाचा एक भाग होण्यासाठी सज्ज आहे. अर्ज प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत सर्व नवरात्री/दुर्गापूजा मंडपांमध्ये वीजजोडणी देण्याची खात्री करण्यासाठी कंपनीने विस्तृत व्यवस्था केली आहे. नवरात्री/ दुर्गापूजा मंडपांना केवळ अधिकृत जोडणी घेण्याचे आवाहन याद्वारे केले आहे. कंपनीच्या www.adanielectricity.comया संकेतस्थळाला भेट देऊन तसेच मुंबईच्या उपनगरात जाळे असलेल्या कंपनीच्या विभागीय ग्राहकसेवा केंद्रांना भेट देऊन वीजजोडणीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in