

मुंबई : वीज क्षेत्राच्या खासगीकरण आणि वीज (सुधारणा) विधेयक विरोधात ऑल इंडिया फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी एम्प्लॉईज या संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. खासगीकरणाविरोधात वीज कामगारांनी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
राष्ट्रीय वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या समन्वय समितीची बैठक नुकतीच मुंबईत संपन्न झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांनी वीज क्षेत्राच्या खासगीकरण आणि वीज (सुधारणा) विधेयक २०२५ विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी आणि अभियंत्यांना एकत्रित करण्यासाठी सर्व राज्यांमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये राज्यस्तरीय संयुक्त अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ३० जानेवारी २०२६ रोजी दिल्ली चलोचे आवाहन केले करण्यात येणार असल्याचे, वीज कामगार नेते कृष्णा भोयर यांनी सांगितले.