मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना मिळणार ‘स्वनिधी से समृद्धी’ योजनेचा लाभ

मुंबईतील पात्र फेरीवाल्यांना मिळणार ‘स्वनिधी से समृद्धी’ योजनेचा लाभ
Published on

मुंबईतील पात्र फेरीवाल्यांच्या जागेचा तिढा कायम आहे. मुंबईत १५ हजार पात्र फेरीवाले असून त्यांच्या व कुटुंबीयांच्या उदनिर्वाहासाठी ‘स्वनिधी से समृद्धी’ या योजनेअंतर्गत ८ योजनांपैकी नियमांत बसणाऱ्या योजनेचा लाभ होणार आहे. यासाठी पात्र फेरीवाल्यांच्या कुटुंबीयांची माहिती गोळा करण्यात येत असून ८ पैकी कुठल्या योजनेसाठी फेरीवाला पात्र ठरतो, त्या योजनेचा पात्र फेरीवाल्यांना लाभ होणार आहे.

मुंबई महापालिका प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल १ लाखांहून अधिक फेरीवाले आहेत. त्यापैकी मुंबई महापालिकेच्या नियमानुसार १५ हजार फेरीवाले पात्र ठरले आहेत. पात्र फेरीवाल्यांना जागा देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र पदपथ विक्रेता समितीत नगरसेवक सदस्य असावा, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली होती. त्यामुळे पदपथ विक्रेता समितीत नगरसेवकांचा समावेश याचा निर्णय राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. पात्र फेरीवाल्यांचा आर्थिक गाडा हाकता यावा, यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत १० हजार रुपये कर्ज देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. तर ‘स्वनिधी से समृद्धी’ ही योजना केंद्र सरकारने अमलात आणली आहे.

पात्र फेरीवाल्यांना लाभ होणार!

पंतप्रधान जीवनज्योती योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना

एक राष्ट्र, एक रेशनकार्ड

जननी सुरक्षा योजना

पंतप्रधान मातृवंदना योजनायोजना

पंतप्रधान जनधन योजना व रुपे कार्ड

logo
marathi.freepressjournal.in