मुंबई : ओपीडीत औषध आहे की नाही, मलेरिया डेंग्यूचे किती रुग्ण, सिटिस्कॅन, लॅबचा रिपोर्ट काही वेळात मिळणार आहे. पालिकेची ५५ रुग्णालये, १९१ दवाखाना व ३० मॅटर्निटी होम्स या ठिकाणी हॉस्पीटल मॅनेजमेंट सिस्टिम (एचएमआयएस) कार्यान्वित करण्यात येणार आहे. मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णात वाढ होते का, याचीही संपूर्ण माहिती मिळणार आहे. या सिस्टिममुळे रुग्णांची वेटिंगची कटकट दूर होणार असून, वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे.
स्वस्त व मोफत उपचार म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून वर्षाला लाखो रुग्ण मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असतात. ‘वेळीच निदान, वेळीच उपचार’ या विश्वासाने रुग्ण पालिका रुग्णालयात धाव घेतात. परंतु रुग्णालयात आल्यावर ओपीडीत रांगेत उभे राहा, सिटिस्कॅन, एमआरआयसाठी वेटिंग, रिपोर्टसाठी लॅबच्या फेऱ्या मारा, यामुळे रुग्णांची गैरसोय होते तर रुग्यालय प्रशासनावरील ताण वाढतो आणि रुग्णालयीन स्टाफ व रुग्णांमध्ये शाब्दिक चकमक उडते. नायर रुग्णालयात हॉस्पीटल मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित असून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने नायर रुग्णालयाया अभ्यास केला आहे. आता त्यांचा रिपोर्ट आला असून रिपोर्टमध्ये रुग्णांची गैरसोय दूर झाली असून रुग्णालय प्रशासनावरील कमी झाला, असे नमूद केले आहे. त्यामुळे हॉस्पीटल मॅनेजमेंट सिस्टिम पालिकेची सगळी रुग्णालये, दवाखाने व मॅटर्निटी होममध्ये कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरवर्षी पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, कावीळ हे साथीचे आजार पसरतात. कुठल्या विभागात मलेरिया, डेंग्यू, कावीळ साथीचे आजाराचे रुग्ण आहेत, हे या सिस्टिममुळे समोर येणार आहे.
दवाखान्यात कुठल्या आजारांचे रुग्ण!
मुंबई महापालिकेचे १९१ दवाखाने आहेत. घराजवळ दवाखाना असल्याने मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. दवाखान्यात ही सिस्टिम कार्यान्वित केल्यानंतर कुठल्या दवाखान्यात कुठल्या आजाराचे अधिक रुग्ण, हे स्पष्ट होणार आहे. यामुळे रुग्णावर वेळीच उपचार करणे शक्य होणार आहे.
या ठिकाणी सिस्टिम कार्यान्वित होणार!
केईएम, नायर, सायन, कूपर या मेडिकल कॉलेजसह ५५ रुग्णालये, १९१ दवाखाना, ३० मॅटर्निटी होम