दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ११ लाखांच्या सोन्याचा अपहार

एका व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे.
दागिने बनविण्यासाठी दिलेल्या ११ लाखांच्या सोन्याचा अपहार

मुंबई : दागिने बनविण्यासाठी दिलेल्या सुमारे अकरा लाख रुपयांच्या सोन्याचा अपहार करून एका व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार काळबादेवी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रशांत माणिकलाल बाग या कारागिराविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. भरत साकलचंद जैन हे परळ येथे राहत असून, त्यांचा टी. जे. ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दागिने विक्रीचे दुकान आहे. व्यापाऱ्याकडून शुद्ध सोन्याचे बार घेऊन त्यांना दागिने बनवून त्यांचा व्यवसाय आहे. प्रशांत हा त्यांच्या परिचित कारागिर असून, त्याचे काळबादेवी परिसरात दागिने बनविण्याचे काम चालते.

logo
marathi.freepressjournal.in