विटा बनविण्यासाठी दिलेल्या १२३ किलो चांदीचा अपहार

ही कंपनीत मार्केटमधून शुद्ध चांदी घेऊन त्याच्या विटा बनवून होलसेलमध्ये विक्री करतात.
विटा बनविण्यासाठी दिलेल्या १२३ किलो चांदीचा अपहार

मुंबई : विटा बनविण्यासाठी दिलेल्या ७६ लाख रुपयांच्या १२३ किलो चांदीचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी एका वयोवृद्ध चांदीच्या व्यापाऱ्याला एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली. रमेश बच्चूभाई सतीकुमार असे या वयोवृद्धाचे नाव असून, अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच त्याच्याकडून अपहार केलेले चांदी हस्तगत केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. चांदीचे व्यापारी असलेले मकरंद विक्रम परिहार यांच्या मालकीची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनीत मार्केटमधून शुद्ध चांदी घेऊन त्याच्या विटा बनवून होलसेलमध्ये विक्री करतात. चांदीच्या विटा बनविण्याचे काम त्यांची कंपनी रमेश सतीकुमार याच्या कांदिवलीतील हिंदुस्तान नाका, एम. जी. रोडवर असलेल्या एस. व्ही. गोल्ड ॲण्ड सिल्व्हर रिफायनरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in