बांधकाम साहित्याचा अपहार; चौघांना अटक

पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता.
बांधकाम साहित्याचा अपहार; चौघांना अटक

मुंबई : बांधकाम साईटच्या साहित्याचा अपहारप्रकरणी चौघांना एमएचबी पोलिसांनी अटक केली. अब्दुल नईम कयुम कुरेशी, शेरअली सैफुला शेख, मोहम्मदअली नबीजान शेख आणि मुस्ताक शौकत शेख अशी या चौघांची नावे असून, अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या चौघांनी अपहार केलेल्या साहित्याची इतर राज्यात विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले असून, त्यांच्याकडून पोलिसांनी तेरा लाखांचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहेत.

दहिसर येथील नवागाव परिसरातील कोलते पाटील ग्रुप कंपनीने त्यांच्या पुण्यातील बाणेर येथे तीन लाख रुपयांचा बांधकाम साहित्य टेम्पोने पाठविले होते. टेम्पोचालक गुलरेज गुलाम रसुल अहमद हा संबंधित साहित्य घेऊन गेला होता; मात्र पुण्याला न जाता त्याने या साहित्याचा अपहार केला होता. हा प्रकार उघडकीस येताच तक्रारदारांनी कंपनीच्या वतीने एमएचबी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता.

logo
marathi.freepressjournal.in