कंत्राटाच्या पैशांचा अपहार; सोसायटीच्या अध्यक्षाला अटक

बोगस बँक गॅरेंटीसह इतर दस्तावेज सादर करुन हैदरने मनपाची सुमारे चौदा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
कंत्राटाच्या पैशांचा अपहार; सोसायटीच्या अध्यक्षाला अटक

मुंबई : बोगस दस्तावेज सादर करून कंत्राटाच्या सुमारे चौदा लाखांचा अपहार करून पालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी हैदर रजा आयुब हुसैन या एका खासगी संस्थेच्या अध्यक्षाला एमएचबी पोलिसांनी अटक केली. बोगस बँक गॅरेंटीसह इतर दस्तावेज सादर करुन हैदरने मनपाची सुमारे चौदा लाखांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

मलेरिया, डेंग्यू या आजाराच्या नियंत्रणासाठी मनपाने विविध सोसायटी, वसाहती, शासकीय-खाजगी हॉस्पिटलसह नवीन बांधकाम ठिकाणी किटकनाशके पुरवून फवारणी करुन घेणे यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यासाठी मनपाने निविदा काढल्या होत्या. मेसर्च अब्बासिया नागरी सेवा सहकारी संस्थेची निवड करून संस्थेला ४५ लाख ३१ हजार रुपयांचे १४० दिवसांच्या कालावधीचे खासगी कंत्राट देण्यात आले होते. त्यासाठी संस्थेला ९० हजार ७०० रुपयांचे बँक गॅरेंटी आणि इतर कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे संस्थेने आवश्यक कागदपत्रांसह बँक गॅरेंटी सादर केले होते.

त्यानंतर मनपाच लेखाधिकारी कार्यालयातून संस्थेत १४ लाख १८ हजार ९१३ रुपये ट्रान्स्फर करण्यात आले होते. काही दिवसांनी या सर्व कागदपत्रांची शहानिशा करण्यात आली होती. त्यात संस्थेने सादर केलेले सर्व कागदपत्रांसह बँक गॅरेंटी बोगस असल्याचे उघडकीस आले.

logo
marathi.freepressjournal.in