तीन हिरे व्यापाऱ्याकडून घेतलेल्या ८२ लाखांच्या हिऱ्यांचा अपहार

धारसीलाल सिंधवा या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अजेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली
तीन हिरे व्यापाऱ्याकडून घेतलेल्या ८२ लाखांच्या हिऱ्यांचा अपहार

मुंबई : तीन हिरे व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या सुमारे ८२ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अजेश धारसीलाल सिंधवा या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अजेश हा पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. नरेश प्रविणभाई गोटी हे हिरे व्यापारी असून, त्यांचा बीकेसी येथील भारत डायमंड बोर्समध्ये गुरुकृपा इम्पेक्स डायमंड नावाची एक कंपनी आहे. त्यांचा हिऱ्यांचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. याच व्यवसायाशी संबंधित हिरे दलाल अजेश सिंधवा हा त्यांच्या परिचित आहेत. त्याच्यासोबत त्यांनी अनेकदा हिर्‍यांचा खरेदी-विक्रीचा व्यवहार केला होता. ऑगस्ट महिन्यांत त्याने त्यांच्याकडून ३४ लाखांचे हिरे विक्रीसाठी घेतले होते; मात्र दिलेल्या मुदतीत त्याने हिरे किंवा हिऱ्याच्या विक्रीतून आलेले पेमेंट कार्यालयात जमा केले नव्हते. वारंवार विचारणा करुनही तो अद्याप पेमेंट मिळाले नसल्याचे सांगत होता. चौकशीदरम्यान अजेशने अशाच प्रकारे १० ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालाधवीत दिपक त्रिकमभाई गेोटी यांच्याकडून २३ लाख ३८ हजार तर उत्सव रसिकभाई वाधासिया यांच्याकडून सुमारे २५ लाखांचे हिरे घेऊन त्यांनाही पेमेंट केले नसल्याचे समजले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in