क्रेडिटवर घेतलेल्या एक कोटीच्या हिऱ्यांचा अपहार

गेल्या दिड वर्षात त्यांच्यात अनेकदा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.
क्रेडिटवर घेतलेल्या एक कोटीच्या हिऱ्यांचा अपहार

मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या एक कोटीच्या हिर्‍यांचा अपहार करुन मुंबईतून जयपूरला पळून गेलेल्या हिरे दलालाविरुद्ध बीकेसी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अशोक खांडेलवाल असे या हिरे दलालाचे नाव असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांचे एक विशेष पथक लवकरच जयपूरला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सेलेस्टियल जेम्स डायमंड कंपनीचे मालक असलेले प्रतिक धनजीभाई रबाडिया हे व्यवसायाने हिरे व्यापारी आहेत. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स कार्यालयातून हिरे खरेदी-विक्रीचा व्यवसाय चालतो. त्यांच्या संपर्कात अनेक व्यापाऱ्यासह हिरे दलाल असून, त्यात उत्कर्ष याचा समावेश होता. तो मूळचा राजस्थानच्या जयपूरचा रहिवाशी आहे. गेल्या दिड वर्षात त्यांच्यात अनेकदा हिरे खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in