३१ लाखांच्या दागिन्यांचा अपहार; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर या दोघांना अटक करण्यात आली
३१ लाखांच्या दागिन्यांचा अपहार; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ३१ लाखांचा सोन्याच्या दागिन्यांचा अपहार करून एका ज्वेलर्स व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचा प्रकार झव्हेरी बाजार परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी करण चौधरी आणि हितेश जैन ऊर्फ ढोलकिया या दोघांविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. जितेंद्र शंकरलाल कोठारी यांचा झव्हेरी बाजार येथे होलसेलमध्ये सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे मुंबईसह महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थानातील व्यापारी सोन्याचे दागिने खरेदीसाठी येतात.

२००८ रोजी जगदीश चौधरीशी ओळख झाल्यानंतर त्याने ३१ लाखांचे विविध सोन्याचे दागिने घेऊन पंधरा दिवसांत पेमेंट करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पेमेंट केले नव्हते. अखेर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यावर या दोघांना अटक करण्यात आली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in