दुबई- कालिकत इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

डीजीसीएने सांगितले की, विमानाच्या फॉरवर्ड गॅलीतील व्हेंटमधून जळण्याचा वास येत होता.
 दुबई- कालिकत इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानाचे कराचीत इमर्जन्सी लँडिंग केल्यानंतर काही तासांनी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचाही अपघात टळला. कालिकतहून दुबईला जाणाऱ्या विमानात अचानक जळण्याचा वास आला. त्यानंतर हे विमान मस्कदच्या दिशेने वळवण्यात आले. डीजीसीएने सांगितले की, विमानाच्या फॉरवर्ड गॅलीतील व्हेंटमधून जळण्याचा वास येत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. विमानाच्या फॉरवर्ड गॅलीतील व्हेंटमधून जळण्याचा वास येत असल्यामुळे वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत इमर्जन्सी लँडिंग केले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांचा खोळंबा झाला. रविवारी सकाळी इंडिगो शारजाह-हैदराबाद विमान पाकिस्तानमधील कराचीला वळवण्यात आले होते. वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. त्यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सध्या या विमानतळावर या विमानाची तपासणी केली जात आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एअरलाइन्सने दुसरे विमान कराचीला पाठवले आहे.

दरम्यान, दोन आठवड्यांत सलग दुसऱ्यांना कराचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. याआधी ५ जुलै रोजी नवी दिल्लीहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाने तांत्रिक बिघाडामुळे पाकिस्तानच्या कराची विमानतळावर सावधगिरीने लँडिंग केले होते. ५ जुलै रोजी स्पाईसजेट बी७३७ विमान ऑपरेटिंग फ्लाइट एसजी -११ (दिल्ली-दुबई) इंडिकेटर लाइटमध्ये बिघाड झाल्यामुळे कराचीला वळवण्यात आले. या आठवड्यात बुधवारी दिल्लीहून इंफाळला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in