मुंबई : मुंबईत अनेक भागांत गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शुक्रवारी अधिकार्यांच्या बैठकीत तातडीच्या इलाजाची मात्रा दिली. यात गळतीचा तातडीने शोध, फुटलेल्या वाहिन्यांची तातडीने दुरुस्ती, बेकायदा जोडण्या, घरात बसवलेल्या मोटारी यांच्यावर कारवाई आदींचा समावेश आहे.
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईत दूषित पाणीपुरवठ्याबाबत नुकतेच ट्वीट केले होते. दोन आठवड्यांपासून लोकप्रतिनिधी, नागरिकांकडून अशा तक्रारी येत आहेत.
जलवाहिन्यांवरील गळती तातडीने शोधून काढावी, गळती शोधून काढण्याससाठी आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करावा, विविध पाळ्यांमध्ये कर्मचारी नियुक्त करावेत, पाणी गळती सापडल्यानंतर ती विनाविलंब दूर करावी, असे निर्देशदेखील महानगरपालिका आयुक्तांनी दिले आहेत.
गगराणी यांनी अधिकार्यांना बजावले की, भांडूप संकूल व पिसे पांजरापूर संकूल जलप्रक्रिया केंद्रातील पाण्याहची पातळी योग्यब राखावी. तथापि, संभाव्य गळती, पाण्याचा उपसा वाढणे आणि बेकायदेशीर मोटर पंपांचा वापर यासोबतच दूषित पाणीपुरवठ्याचा स्रोत शोधला पाहिजे, या गोष्टींवर देखरेख ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचा उपसा जेवढा सुनिश्चित केला आहे, तेवढाचा केला पाहिजे. पाण्याेचा अतिरिक्त उपसा होणार नाही, याची दक्षता बाळगली पाहिजे. त्यायचबरोबर 'व्हॉल्व्ह ऑपरेशन' वर संपूर्ण नियंत्रण ठेवून पाणीवाटप कोट्यानुसार संपूर्ण कार्यक्षेत्राला पाणीपुरवठा होतो की नाही यावरदेखील देखरेख ठेवली पाहिजे. बेकायदेशीर मोटार पंप, अनधिकृत नळजोडण्या यांना आळा बसावा म्हणून पथके नेमावीत, असे अनधिकृत प्रकार आढळल्यास मोटारपंप जप्त करावेत, तसेच दंडात्मक कारवाई करावी.
"पाणीपुरवठ्याविषयी लोकप्रतिनिधींकडून विविध सूचना, तक्रारी प्राप्तन होताच त्यावची तातडीने दखल घ्याठवी. त्यांिना त्वरित प्रतिसाद द्यावा. त्यात तक्रारीची कार्यवाही विनाविलंब व्हावी, लोकप्रतिनिधींच्या तक्रारींच्या निराकरणाबाबत त्वरित माहिती द्यावी. जल विभागाचे दुय्यम अभियंता, सहायक अभियंता, कार्यकारी अभियंता इत्यादी सर्व यंत्रणेने प्रत्य्क्ष कार्यस्थळावर उपस्थित रहावे. नागरिकांच्या घरात, परिसरात नळांना येणारे पाणी पुरेशा दाबाने, स्वच्छ येते का याची खातरजमा करावी. नागरिकांनी पाणीपुरवठाविषयक तक्रारींसाठी १९१६ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा."
- भूषण गगराणी, पालिका आयुक्त
विकासकामांचा फटका
मुंबईत महानगरपालिकेसह इतर प्राधिकरणांमार्फत रस्तेव विकासासह इतर कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या कामांमुळे जलवाहिनींना काही ठिकाणी हानी पोहोचते. परिणामी, संबंधित परिसरातील पाणी पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम होतो.संबंधित यंत्रणेला या बाबत त्वणरित माहिती देऊन तातडीने दुरूस्तीर करावी, असे आदेश गगराणी यांनी दिले.
या ठिकाणी तक्रारी
एफ दक्षिण विभागातील टी. जे. मार्ग, गाडी अड्डा, क्रीसेंट बे, जेरबाई वाडिया रस्ता, गं. द. आंबेकर मार्ग, भोईवाडा स्मशानभूमी, एफ उत्तर विभागातील जोगळेकर वाडी, जी दक्षिण विभागातील सेंच्युरी मिल म्हाडा कंपाऊंड, सीताराम जाधव मार्ग, ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड याचबरोबर वांद्रे (पूर्व) येथील खारदांडा, आप्पा पाडा, क्रांती नगर, मालाड दिंडोशी, बोरिवली येथील राजेंद्र नगर आदी क्षेत्रात कमी दाबाने पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत.