देशांतर्गत पर्यटन वाढविण्यावर भर! केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ. साग्निक चौधरी यांची ग्वाही

भारतीय पर्यटन उद्योगापुढे पुरेशा पायाभूत सुविधा, कौशल्याधारित मनुष्यबळ व आर्थिक भांडवलाचे आव्हान आहे. ते लक्षात घेऊन देशांतर्गत पर्यटन वाढिवण्यावर भर देण्याची ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे उपमहासंचालक, पश्चिम व मध्य विभागीय संचालक डॉ. साग्निक चौधरी यांनी दिली.
देशांतर्गत पर्यटन वाढविण्यावर भर! केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे उपमहासंचालक डॉ. साग्निक चौधरी यांची ग्वाही
SALMAN ANSARI
Published on

मुंबई : भारतीय पर्यटन उद्योगापुढे पुरेशा पायाभूत सुविधा, कौशल्याधारित मनुष्यबळ व आर्थिक भांडवलाचे आव्हान आहे. ते लक्षात घेऊन देशांतर्गत पर्यटन वाढिवण्यावर भर देण्याची ग्वाही केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे उपमहासंचालक, पश्चिम व मध्य विभागीय संचालक डॉ. साग्निक चौधरी यांनी आज दिली. आयआरसीटीसीमार्फत मुंबई दर्शन योजना लवकरच सुरू करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.

नवशक्ति-फ्री प्रेस वृत्तपत्र समुहाचे संचालक अभिषेक कर्नानी यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्याशी देशातील पर्यटन विकासाच्या संधींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यानंतर त्यांनी नवशक्ति व फ्री प्रेस जर्नल वृत्तपत्र समुदायातील पत्रकारांशी संवाद साधला.

सध्या भारतात १कोटी २५ लाख पर्यटक पर्यटनासाठी येतात़ परंतु २०४७ पर्यंत १० कोटी पर्यटकांचे लक्ष्य गाठण्याचे ध्येय केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने ठेवले आहे़, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

बोधगया, सारनाथ अशा स्थळांना विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर भेट देतात, तर गोवा हे सर्वांचे आवडीचे पर्यटनस्थळ बारा महिने पर्यटकांना आकर्षित करते. महाराष्टातील नाशिक, त्रंबकेश्वर ही ठिकाणेही पर्यटकांच्या यादीवर अग्रस्थनी असतात़ असे असले तरी अशा ठिकाणी पर्यटकांना मिळणाऱ्या सोयी सुविधा या अपेक्षेनुसार असतातच असे नाही. वास्तव्यासाठी हॉटेल्स, वाहतूक आणि सुरक्षा यांना असाधारण महत्त्व आहे. यामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी स्थानिक पातळीवर पर्यटन विकास संस्थांची गरज आहे की ज्या पर्यटकांच्या समस्या सोडवण्यास मदत करतील.

एकाच ठिकाणी पर्यटकांची अफाट गर्दी होऊ लागल्यास त्याचाही पर्यटन उद्योगावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी देशातील प्रत्येक पर्यटन स्थळांच्या विकासासाठी डेव्हलपेंट डेस्टिनेशन ऑर्गनायझेशन अर्थात पर्यटन विकास संस्था स्थापन करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे सर्व पर्यटन स्थळांचा समतोल विकास साधता येईल आणि पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होईल.

रोजगाराच्या अनेक संधी

पर्यटन उद्योगात रोजगाराच्या अनेक संधी आहेत, मात्र त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या क्षेत्रात तरुणांना रोजगारासाठी आकर्षित करण्यासाठी चांगला मोबदला मिळाला पाहिजे तरच ते या क्षेत्राकडे वळतील. याशिवाय हॉटेल व्यवसायातील नोकऱ्यांना कमी दर्जाचे न मानता हे काम करणाऱ्यांना समाजात मानाची वागणूक मिळाली पाहिजे असे चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

मुंबईासठी स्मार्ट कार्ड योजना

महाराष्ट राज्य त्या अर्थाने नशीबवान आहे कारण इथे पर्यटनाला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे़ मुंबईला अनेक देशी-विदेशी पर्यटक भेटी देतात. मुंबईत पर्यटकांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबविण्याचा आपला मानस असल्याचे चौधरी म्हणले. लंडन किंवा अमेरिकेत स्मार्ट कार्ड विकत घेऊन पर्यटक कोणत्याही स्थळी तिकीटासाठी रांग न लावता प्रवेश करू शकतात. त्या धर्तीवर मुंईतही ‘मुंबई दर्शन’ नावाने पर्यटकांसाठी योजना सुरू करणार आहोत. यामुळे पर्यटकांचा बराच वेळ वाचेल.

नागरिकांना संवेदनशील करण्याचे प्रयत्न

देशी -विदेशी पर्यटकांसोबत अनुचित प्रकार होऊ नये यासाठी काय उपाय योजना करता येतील या प्रश्नावर चौधरी म्हणाले, पर्यटन मंत्रालय हे पर्यटकांना मदत करण्यासाठी आहे. त्यांच्याकडे अन्य कोणतेही अधिकार नाहीत. कायदा व सुरक्षेचे अधिकार स्थानिक पोलिसांना आहेत. परंतु असे असले तरी स्थानिक सहल आयोजकांना तसेच लोकांमध्ये पर्यटनाबद्दल जागृती येण्यासाठी विविध प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in