कर्मचाऱ्यांनी दिवाळी होणार गोड! मुंबई, ठाणे, केडीएमसी महापालिकेकडून बोनस जाहीर

दिवाळी बोनसच्या मागमीबाबत कर्मचारी संघटनांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सोबत बैठक झाली होती.
कर्मचाऱ्यांनी दिवाळी होणार गोड! मुंबई, ठाणे, केडीएमसी महापालिकेकडून बोनस जाहीर
Published on

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. मुंबई महापालिकेने अखेर बोनस जाहीर केला आहे. दिवाळी बोनस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालिका यायुक्तांची बैठक झाली. त्यानंतर बोनस जाहीर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये इताना बोनस जाहीर केला आहे. तर आरोग्य सेविकांना एका महिन्याचा पगार बोसन म्हणून मिळणार आहे.

दिवाळी बोनसच्या मागमीबाबत कर्मचारी संघटनांची मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या सोबत बैठक झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्त आणि प्रशासक इकबाल सिंह यांची मुख्यमंत्र्यांसोबत सानुग्रह अनुदान मिळावं यासाठी बैठक पार पडली. गेल्यावर्षी २२,५०० रुपये इतका दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. यावर्षी ३० हजार बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात कर्मचारी कामगार संघटना समन्वय समितीने केली होती. त्यामुळे मुंबई महापालिका किती बोनस जाहीर करणार याकडे सर्वांच लागलं होतं. मागील वर्षी २२ हजार पाचशे रुपये बोनस मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनामिळाला होता. यंदा यात साडेतीन हजारांची वाढ करत २६ हजार रुपये बोनस दिला जाणार आहे.

दुसरीकडे ठाणे महानगरपालिकेकडून आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानामध्ये भरघोस २० टक्के वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी १८ हजार रुपये इतका बोनस दिला होता. तर यंदा यात २० टक्के वाढ झाली असून २१ हजार ५०० रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. तसंच आशा सेविकांना यंदा ६०० रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचं वातावरण आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेडून आपल्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी सानुग्रह अनुदानात वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी १६ हजार ५०० रुपये इतका बोनस दिला होता. तर या वर्षी यात वाढ झाली असून १८५०० रुपये इतका बोनस देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in